Ad will apear here
Next
कर्मवीरांची जयंती उत्साहाने साजरी

पंढरपूर : रोपळे (ता. पंढरपूर, जि. सोलापूर) येथील पाटील विद्यालयात २२ सप्टेंबर रोजी कर्मवीर भाऊराव पाटील यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. या वेळी कर्मवीरांच्या प्रतिमेची गावातून भव्य मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीसमोर विद्यार्थ्यांनी विविध सामाजिक संदेश देणारी पथनाट्ये व इतर कलाविष्कार सादर करून ग्रामस्थांची वाहवा मिळवली. 

कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या जयंतीचा उत्सव रोपळे गावात नेहमीच वेगळ्या पद्धतीने साजरा केला जातो. कर्मवीरांच्या प्रतिमेची मिरवणूक काढण्यासाठी भलामोठा कलश तयार करण्यात आला होता. त्या कलशाच्या प्रतिकृतीमध्ये कर्मवीरांची प्रतिमा ठेवली होती. मिरवणुकीसमोर विद्यार्थ्यांनी दांडपट्टा, तलवारबाजी सादर केली. मुलींचे लेझीम, झांजपथकही त्यात होते. त्यासोबतच वृक्षदिंडी काढण्यात आली. टिपरी नृत्याबरोबरच पर्यावरण संरक्षणाचा संदेश देणारे पथनाट्यही सादर करण्यात आले. प्लास्टिकचा वापर टाळण्याचा संदेश मुलींनी पथनाट्यातून दिला. त्यानंतर मुलींच्या लेझीम सादरीकरणाला ग्रामस्थांनी विशेष दाद दिली. विद्यार्थ्यांनी मनोऱ्याद्वारे स्वच्छ भारत अभियानाचाही संदेश दिला. अशा प्रकारे आणखीही काही सामाजिक संदेश देणारे मनोरे विद्यार्थ्यांनी तयार केले होते. 


मिरवणूक पाहण्यासाठी ग्रामस्थांनी मोठी गर्दी केली होती. प्रारंभी कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन रयत शिक्षण संस्थेच्या सर्वसाधारण सभेचे सदस्य बाळासाहेब पाटील, अंकुश भोसले, विनायक निंबाळकर, मुख्याध्यापक एस. एम. बागल, पर्यवेक्षक टी. बी. ताटे यांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर मिरवणूक एसटी बस थांब्यामार्गे गावात गेली. तेव्हा गावात विविध ठिकाणच्या चौकीत विद्यार्थ्यांनी आपला कलाविष्कार सादर केला. या वेळी सरपंच दिनकर कदम, स्कूल कमिटी सदस्य नागनाथ माळी, नारायण गायकवाड, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष जनक भोसले आदी मान्यवरांसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.



 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/WZOVBG
Similar Posts
‘तरुण पिढीने सावित्रीबाईंच्या विचाराचा वारसा जपावा’ सोलापूर : ‘राष्ट्राला विकासाकडे नेण्यासाठी आजच्या तरुण पिढीने क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या विचारांचा वारसा जपला पाहिजे,’ असे प्रतिपादन सुप्रभात ग्रुपचे सदस्य सूर्यभान चव्हाण यांनी केले.
पंढरपूर येथे बुद्धिमान विद्यार्थी उन्हाळी वर्ग सोलापूर : ‘रयत शिक्षण संस्थेच्या शाळांमध्ये शिकलेला विद्यार्थी गुणवत्ता यादीत चमकण्यासाठी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी यावर्षी प्रथमच बुद्धिमान विद्यार्थी उन्हाळी वर्ग सुरू करण्यात आला आहे. हा उपक्रम पंढरपूर येथील यशवंत विद्यालयात सुरू करण्यात आला असून, यामध्ये सुमारे ११५ विद्यार्थी सहभागी झाले
इको-फ्रेंडली गणेशमूर्ती कार्यशाळा पंढरपूर : रोपळे (ता. पंढरपूर, जि. सोलापूर) येथील रयत शिक्षण संस्थेच्या पाटील विद्यालयात इको-फ्रेंडली गणेशमूर्ती बनवण्याची कार्यशाळा घेण्यात आली. इयत्ता पाचवी ते दहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांनी यात सहभाग घेऊन पर्यावरणाला पूरक अशा आकर्षक गणेशमूर्ती साकारल्या.
क्रीडा स्पर्धांत उज्ज्वल यश पंढरपूर : रोपळे (ता. पंढरपूर) येथील रयत शिक्षण संस्थेच्या शि. बा. पाटील   माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांनी तालुका व जिल्हा स्तरावरील विविध क्रीडा स्पर्धांत घवघवीत यश संपादन केले. कराटे, किक बॉक्सिंग व शिकई मार्शल आर्ट स्पर्धेत विद्यालयातील तीन विद्यार्थ्यांची विभागीय स्तरावर निवड झाली

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language